Shetkari Karjmukti Yojna | सांगलीतील 141 शेतकऱ्यांकडून कर्जमुक्ती योजनेचा गौरफायदा
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा सांगली जिल्ह्यातील 141 शेतकऱ्यांनी गैरलाभ घेतल्याचे उघडकीस आले आहे. गैरलाभ घेणाऱ्या 141 शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश सांगली जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले आहेत. 141 शेतकऱ्यांपैकी 110 जणांच्या खात्यावर 92 लाख रुपये निधी वर्ग देखील झाला होता. संबंधितांवर शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांना देण्यात आले आहेत.