Sangli ची खुर्ची थेट Manchester मध्ये! बाळू लोखंडेंनी भंगारात विकलेली खुर्ची इंग्लंडला कशी पोहोचली?
सांगली : माणसाच्या जन्मापासून सुरु झालेला प्रवास मृत्यू होईपर्यंत सुरुच असतो. आणि हा प्रवास कोणालाही चुकला नाही. मात्र, सांगलीतील एक खुर्ची थेट लंडनपर्यंत पोहचली आहे. लंडन मधील मँचेस्टरमध्ये एका रेस्टॉरंट बाहेर ही खुर्ची आढळलीय. क्रिकेट समालोचक सुनंदन लेले यांनी या खुर्चीचा व्हिडीओ सोशल मीडियावर केला शेअर केला आहे. या व्हिडीओनंतर ही खुर्ची आता नेटकऱ्यांता चर्चेचा विषय झाली आहे. काय आहे या मागची गोष्ट? सांगलीतील खुर्ची लंडनपर्यंत कशी पोहचली? चला जाणून घेऊया.
तासगाव तालुक्यातील सावळज मधील बाळू लोखंडे या मंडप डेकोरेटर यांची ही लोखंडी खुर्ची आहे. ही खुर्ची थेट लंडन मधील मँचेस्टरमध्ये एका रेस्टॉरंट बाहेर आढळली. क्रिकेट समालोचक सुनंदन लेले यांनी या खुर्चीचा व्हिडीओ सोशल मीडियावर केला शेअर आणि इकडे महाराष्ट्रात बाळू लोखंडे यांच्या नावाची चर्चा सुरु झाली. मँचेस्टर मध्ये एका रेस्टॉरंट बाहेर मराठीत नाव आणि गाव लिहिलेल्या अवस्थेत खुर्ची आढळल्याने ही खुर्ची नेटकऱ्यामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. बाळू लोखंडे यांनी ही लोखंडी खुर्ची पंधरा वर्षापूर्वी भंगारमध्ये विकली होती.