Sangli : आष्टी शहरात महाआरती कार्यक्रमासाठी लावलेल्या खुर्च्या पोलिसांकडून गोळा, शिवप्रेमींचा ठिय्या
Continues below advertisement
सांगलीतील आष्टा शहरामध्ये शिवप्रेमीनी ठिया मांडलेल्या ठिकाणी महाआरती करून आंदोलन संपवलं आहे... परवानगीविना छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा बसवल्यानें पोलीसांनी आक्रमक भुमिका घेतली होती.. पोलिसांनी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीनं पुतळ्यासमोर लावलेला मांडव काढायला सुरुवात केली.. शिवाय महाआरती कार्यक्रमासाठी लावलेल्या खुर्च्या पोलिसांनी गोळा केल्या... यामुळे शिवप्रेमी आक्रमक झाले होते... उद्या आष्टा नगरपालिकेकडून पुतळा उभारलेल्या जागेची फी जिल्हाधिकारी कार्यालयात भरून जागेची हस्तारण प्रकिया होणार असे आश्वासन आंदोलनकर्त्याना देण्यात आलंय... महाराजांचा पुतळा हटवला जाणार नाही याची प्रशासनाने खबरदारी घेतलीय... त्यानंतर आंदोलकांनी आपलं आंदोलन संपवलंय...
Continues below advertisement