ST Worker Corona Positive | मुंबईहून परतलेले 100 हून अधिक एसटी कर्मचारी कोरोनाग्रस्त

Continues below advertisement

मुंबईहून सेवा बजावून सांगलीत परतलेल्या 9 एसटी डेपोंमधील अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. काही दिवसांपूर्वी राज्य शासनानं कोरोना संकटामुळे थांबलेल्या सेवा पूर्ववर्त करण्यासाठी जिल्ह्यांतर्गत एसटी प्रवासाला परवानगी दिली होती. त्यानंतर मुंबईत सेवा बजावून सांगली जिल्ह्यात परतलेल्या एस.टी मधील चालक-वाहकांना कोरोनाची लागण झाली असून हा आकडा 80 वर गेला आहे. आतापर्यंत जिल्ह्यांतील 9 डेपोमधील 80 हून अधिक चालक-वाहक कोरोना बाधित झाल्याचे समोर आले आहे. यामुळे एस.टी प्रशासनाची धाकधूक वाढली आहे.

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे मुंबई लोकल सेवा बंद करण्यात आली. अनलॉक प्रक्रियेत सर्व पूर्ववर्त करण्यासाठी बेस्ट सेवा आणि एसटी सेवा सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली. परंतु, लोकल सेवा बंद असल्यामुळे बेस्ट सेवेवर संपूर्ण ताण पडत होता. त्यामुळे राज्यांतील प्रमुख एसटी बस डेपोमधून काही बसेस या मुंबईकडे रवाना झाल्या होत्या. गेले अनेक दिवस एसटी कर्मचारी मुंबईत सेवा देत होते. सांगली जिल्ह्यातूनही 100 च्या आसपास एसटी बस या मुंबईत दाखल झाल्या होत्या. तसेच जवळपास 400 कर्मचारी हे गेल्या 12 दिवसांपासून मुंबईत सेवा देत होते. या कर्मचाऱ्यांचा सेवेचा कालावधी संपल्यामुळे दोन दिवसांपूर्वी नवीन 400 जणांची टीम मुंबईत दाखल झाली आणि सुरुवातीला सेवा देण्यासाठी हजर झालेले कर्मचारी पुन्हा आपल्या जिल्ह्यांत परतले.

एसटी सेवा देणारे कर्मचारी जिल्ह्यांत परतल्यानंतर त्यांची रॅपीड अॅन्टीजन टेस्ट करण्यात आली. त्यामधील काही कर्मचारी कोरोना बाधित असल्याचं आढळून आलं. सध्या 80 एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं निष्पन्न झालं आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 9 डेपोमधील 80 चालक-वाहक बाधित झाल्याचे समोर आले आहे. तसेच हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात असून सध्या एसटी प्रशासनाची धाकधूक वाढल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, ज्या कर्मचाऱ्यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram