
Sangameshwar : भाताची लावणी, बांधावर बसून भाकर खाण्याची मज्जा! कोकणातील निसर्ग बहरले
Continues below advertisement
कोकणात चांगलाच पाऊस झाल्यामुळे शेतीची कामं आता अंतिम टप्प्यात आली आहेत. त्यामुळे सध्या शेतातल्या बांधावर शेतकरी भात शेतीची लावणी करताना दिसून येतोय. दरम्यान एका बाजूला हिरवा परिसर तर दुसऱ्या बाजूला डोंगर रांगांमध्ये होत असलेली शेतीची कामे, जोडीला बांधावर बसून भाकर खाण्याची मजा काही औरच. पावसाळ्यामध्ये कोकणचं सौंदर्य अधिक फुलतं पण त्याच वेळेला कोकणात लाल चिखलात सुरू असलेली शेती एक वेगळंच समाधान देऊन जाते. दरम्यान कोकणात सुरू असलेल्या या शेतीचे ड्रोन व्हिडीओ टिपले आहेत संगमेश्वरमधील अभिषेक खातू यांनी...
Continues below advertisement