Sangali: महाराष्ट्राच्या सुपुत्राला सांगलीमध्ये वीरमरण, शिगावचे रोमित चव्हाण शहीद ABP Majha

जम्मू काश्मीरच्या शोपियांमध्ये भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झालीय... या घटनेत सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातील शिगावच्या रोमित तानाजी चव्हाण यांना वीरमरण आलंय.. रोमित यांचं फक्त २३ वर्षे इतकं होतं. .दक्षिण काश्मीरमधील शोपियानमध्ये शुक्रवारी रात्री ही चकमक झाली होती..  या रोमित यांच्यासह संतोष यादव यांनाही या घटनेत हौतात्म्य प्राप्त झालंय. हे दोघंही राष्ट्रीय रायफल्समध्ये तैनात होते. रोमित यांचं पार्थिव आज पुण्यात आणलं जाईल आणि त्यानंतर उद्या सांगलीतील मूळगावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. रोमित चव्हाण यांच्या हौतात्म्याची बातमी समजताच त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. तसंच शिगाव गावावर शोककळा पसरलीय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola