Sangli : हसन मुश्रिफांची मिश्किल टिपण्णी, बाहेर पडलं की पाऊस टीव्ही लावला की राऊत :Hasan Mushrif
महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेच्या काळातील एक किस्सा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगलीतील कार्यक्रमादरम्यान सांगितलाय.. बाहेर पडला की पाऊस आणि टीव्ही लावला की राऊत... अशी मिश्कील चारोळी मुश्रीफांनी कार्यक्रमात केली.. इस्लामपूर पंचायत समितीत लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुतळयाचं अनावरण हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झालं. यावेळी सभेत त्यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकांनंतरची आठवण सांगितली..