ABP News

Sandip Deshpande vs Sanjay Raut : ठाण्यात शिवसेना आणि मनसेत राड्यावरून राजकारण तापलं

Continues below advertisement

Sandip Deshpande vs Sanjay Raut : ठाण्यात शिवसेना आणि मनसेत राड्यावरून राजकारण तापलं  

 उद्धव ठाकरे यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर नारळफेक आणि शेणाचा मारा करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून लवकरच कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. ठाकरे यांच्या गाडीवर नारळ आणि शेणाचा मारा केल्यानंतर (Uddhav Thackeray car attack) मनसेचे जवळपास 44 कार्यकर्ते पसार झाले होते. यापैकी कोणीही अद्याप ठाणे पोलिसांच्या हाती लागलेले नाही. मात्र, या कार्यकर्त्यांवर कठोर पोलीस कारवाई होण्याची शक्यता आहे. मनसेच्या (MNS) या कार्यकर्त्यांना अटक झाल्यास जामीन मिळण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे आता राज ठाकरे आणि मनसेची कायदेशीर टीम कशाप्रकारे पावले उचलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

ठाण्याच्या गडकरी रंगायतनबाहेर राडा घालणाऱ्या मनसेच्या 44 कार्यकर्त्यांवर नौपाडा पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. गाड्यांवर हल्ला करणे, गोंधळ घातल्या प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल केले होते. रात्री ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना नोटीसा देऊन सोडण्यात आल्यानंतर रात्री उशिरा नौपाडा पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर पोलिसांनी सोडून दिलेल्या या  महाराष्ट्र सैनिकांचा शोध पुन्हा सुरु केल्याची माहिती आहे.

राज ठाकरे लोकनेते, त्यांना ऐकण्यासाठी हजारोंची गर्दी जमते, उद्धव ठाकरेंच्या सभेला गर्दी होत नाही; शिंदे गटाच्या नेत्याचा टोला

सिंधुदुर्ग: मनसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर शेण किंवा नारळ फेकणे हा दोन भावांमधील वाद आहे. राज ठाकरे हे लोकनेते आहेत. त्यांच्याविषयी काही बोललं की लोकांचा उद्रेक वाढतो. त्यामुळे संजय राऊत यांनी त्या पद्धतीने बोलणं बंद केलं पाहिजे. हे ठाकरे कुटुंबाला शोभणारे नाही. राज ठाकरे लोकनेते असल्याने त्यांना ऐकण्यासाठी हजारो लोक येतात. उद्धव ठाकरे यांच्या सभेला काहीच लोक जमतात. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे माडलेले प्रश्न लगेच कसे सुटतात, असे वक्तव्य शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी केले. ते रविवारी सिंधुदुर्गात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram