Sandeep Kshirsagar : Walmik Karadला पोलीस स्टेशनमध्ये VIP ट्रीटमेंट सुरु;संदीप क्षीरसागर आक्रमक
Sandeep Kshirsagar : Walmik Karadला पोलीस स्टेशनमध्ये VIP ट्रीटमेंट सुरु;संदीप क्षीरसागर आक्रमक
बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन राजकारण चांगलच तापलं असून आता नेतेमंडळींकडून एकमेकांवर गंभीर आरोप होत आहेत. त्यातच, विधानसभा सदस्य म्हणजेच आमदारांच्या भाषेचा स्तर खालावल्याचे पाहायला मिळत आहे. आमदार सुरेश धस यांच्याकडून राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते अजित पवार यांना लक्ष्य करण्यात आलं असून धनंजय मुंडेंना मोठे आका म्हणत त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी आज माध्यमांसमोर सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या 2 दिवसांपूर्वी धस यांनी वाल्मिक कराडशी फोनवरुन संपर्क केल्याचंही मिटकरी यांनी म्हटलं आहे. एकीकडे धस विरुद्ध मिटकरी असा सामना रंगला असताना, ट्विटरवरुन मिटकरी विरुद्ध क्षीरसागर यांच्यात जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. आमदार संदीप क्षीरसागर (Sandip kshirsagar) यांनी अजित पवारांवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देतान आमदार मिटकरी यांनी संदीप क्षीरसागर यांना चक्क कलंक्या असे म्हटलं आहे.