
Sandeep Deshpande : बाबासाहेब पुरंदरेंनी Oxford ला पत्र लिहिलं होतं, शरद पवारांना माहित नव्हतं का?
Continues below advertisement
राज ठाकरे यांनी ठाण्यातल्या उत्तर सभेत शरद पवारांवर निशाणा साधताना बाबासाहेब पुरंदरेंवर होणाऱ्या टीकेचा उल्लेख केला होता. आणि ही टीका योग्यच असल्याचं प्रत्युत्तर शरद पवारांनी कालच्या पत्रकार परिषदेत दिलं. ही सर्व टीका सुरू झाली होती ती जेम्स लेनच्या पुस्तकावरून. जेम्स लेनला हे पुस्तक लिहीण्यात बाबासाहेब पुरंदरेंनी मदत केल्याचा आरोप आहे. मात्र आता यासंदर्भात मनसेनं बाबासाहेब पुरंदरे यांचं एक पत्र समोर आणत शरद पवारांची टीका खोडण्याचा प्रयत्न केलाय. जेम्स लेनच्या पुस्तकावर बंदी आणणारं पत्र पुरंदरेंनी ऑक्सफर्ड प्रकाशनला लिहीलं होतं. ते पत्र समोर आणत मनसेनं शरद पवारांना प्रश्न विचारले आहेत.
Continues below advertisement