Sandeep Deshpande on MNS | मनसेचा पाठिंबा असल्याचं पत्र व्हायरल, संदीप देशपांडे काय म्हणाले?

Continues below advertisement

Sandeep Deshpande on MNS | मनसेचा पाठिंबा असल्याचं पत्र व्हायरल, संदीप देशपांडे काय म्हणाले?

 - किशोरी पेडणेकर डोक्यावर पडलेल्या नर्स - आज आमच्या मतदारसंघात मनसेचा पाठिंबा असल्याचं एक खोटं पत्र तयार करण्यात आलं - राजसाहेबांची सही त्यावर आहे - आम्ही तक्रार दाखल केली आहे - शिंदेंच्या पदाधिकाऱ्याने आमच्या कार्यकर्त्याला फेक पत्र whatsapp वर पाठवलं अजून काय पुरावा पाहिजे ? 

हे ही वाचा...

 विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. आज आज (२० नोव्हेंबर) विधानसभेसाठी मतदान पार पडत आहे. या मतदानानंतर निवडणुकीचा (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) निकाल २३ नोव्हेंबर रोजी लागणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागलेलं आहे. आज राज्यभरात विविध मतदारसंघात मतदान पार पडत असताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यातच काही ठिकाणी मारहाणीच्या घटनाही समोर आल्या आहेत.

यातच आता वर्धा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे पदाधिकारी नितेश कराळे यांना मारहाण झाल्याची माहिती सांगितली जात आहे. यासंदर्भात एक व्हिडीओही समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती नितेश कराळे यांना मारहाण करत असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, यानंतर नितेश कराळे यांनी आपल्याला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याने मारहाण केल्याचा आरोप केला आहे. तसेच नेमकी काय घडलं? याबाबत सविस्तर घटनाक्रमही त्यांनी सांगितला आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram