Sanajy Raut On Kirit Sommiya : 'आयएनएस विक्रांत'चा निधी सोमय्यांनी निवडणुकीसाठी वापरला,राऊतांचा आरोप

काल ईडीनं संजय राऊतांच्या जवळपास 11 कोटींच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई केल्यानंतर आज संजय राऊतांनी आयएनएस विक्रांत फाईल ओपन करत किरीट सोमय्यांवर पलटवार केलाय.. युद्धनौका आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी किरीट सोमय्यांनी गोळा केलेला निधी राजभवनात पोहोचलाच नाही. आरटीआय अंतर्गत राजभवनाकडून मिळालेल्या माहितीवर बोट ठेवत संजय राऊतांनी आरोपांच्या फैरी झाडल्या आहे.... आयएनएस विक्रांतच्या नावाखाली गोळा केलेला पैसा किरीट सोमय्यांनी निवडणुकांसाठी आणि मुलगा नील सोमय्यांच्या कंपनीत वापरला असा आरोप राऊतांनी केला. महाराष्ट्र पोलीस याचा तपास करेलच, मात्र केंद्रीय तपासयंत्रणा पारदर्शी असतील तर त्यांनी देखील या प्रकरणाचा तपास करुन दाखवावा असं आव्हान राऊतांनी केलंय...  त्यामुळं किरीट सोमय्या आता राऊतांच्या आरोपांना काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे..  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola