Samruddhi Mahamarga: समृद्धी महामार्गावर 22 ठिकाणी औद्योगिक शहरे उभी राहणार
Samruddhi Mahamarga: समृद्धी महामार्गावर 22 ठिकाणी औद्योगिक शहरे उभी राहणार सरकारने समृद्धी महामार्गावर 22 इंटरचेंजच्या बाजूला औद्योगिक शहरे उभारण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी सरकार आणि उद्योजकांची नाशिक इथे बैठक पार पडली. त्यानंतर आता लवकरच उद्योजकांसोबत सरकार समृद्धी महामार्गावर 22 ठिकाणी औद्योगिक शहरे उभी करणार असल्याची खात्रीलायक माहिती एबीपी माझाला मिळाली आहे.