Samruddhi Mahamarg : 'समृध्दी' वर अनधिकृत फूड स्टॉलची गर्दी, अपघाताला निमंत्रण? : ABP Majha
Continues below advertisement
मोठा गाजावाजा करत नागपूर ते शिर्डी हा समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा सुरु करण्यात आला... मात्र याच समृद्धी महामार्गाची सुरक्षा धोक्यात आली आहे... समृद्धीवरून प्रवास करताना मध्येच कुठेही थांबू नये अशा सूचना वाहनचालकांना देण्यात आल्या आहेत.. मात्र तरीही अनेक वाहनधारक महामार्गाच्या कडेला वाहनं थांबवत असल्याचं दिसतंय.. त्याला कारणही तसंच आहे ते म्हणजे महामार्गालगत उभारण्यात आलेले अनधिकृत फूड स्टॉल्स आणि हॉटेल्स... या फूड स्टॉल्समुळे कार आणि ट्रक काही वेळाचा थांबा घेत असल्याने अपघाताला निमंत्रण दिलं जातंय.. गेल्याच आठवड्यात थांबलेल्या वाहनाला धडक दिल्याने अपघाताची घटना घडली होती... मात्र त्यानंतरही रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱयांनी कुठलीही कारवाई केली नसल्याचं समोर आलंय...
Continues below advertisement