Samruddhi Mahamarg Punctures | समृद्धी महामार्गावर खिळ्यांचा धोका, कंपनीच्या कामावर प्रश्नचिन्ह
समृद्धी महामार्गावर रात्री उशिरा नागपूरहून मुंबईकडे निघालेल्या अनेक गाड्या पंक्चर झाल्या. ब्रिजवर मोठ्या प्रमाणात विशिष्ट खिळे ठोकल्याची रांग दिसून आली. प्रथमदर्शनी हे खिळे चोरट्यांनी ठोकले असावे असा संशय आला होता, कारण यापूर्वी सांगवी भागात चोरट्यांनी गाड्या अडवून लुटल्याचे प्रकार घडले होते. मात्र प्रत्यक्षात स्थिती वेगळीच होती. रस्त्याचे काम करणाऱ्या कंपनीनेच हे खिळे ठोकले होते. रस्त्याचे काम सुरू असताना बॅरिकेडिंग का केले नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. लोकांच्या गाड्या पंक्चर झाल्यानंतर रात्री हे खिळे काढून टाकण्यात आले. ते दिवसा काढले असते तर प्रवाशांचा हा त्रास वाचला असता. रात्री बारा ते तीन या वेळेत अनेक गाड्या पंक्चर झाल्याने सर्वसामान्य प्रवाश्यांना नाहक मनस्ताप झाला. कंपनीच्या या धोरणामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.