Samruddhi Mahamarg :समृद्धीवरून जास्त वेगाने जाताय तर सावध व्हा, वेग मर्यादा ओलांडणाऱ्यांना समुपदेशन

Continues below advertisement

मृद्धी महामार्गावरून मर्यादेपेक्षा जास्त वेगाने जाताय तर आधीच सावध व्हा. कारण समृद्धीवरील अपघात रोखण्यासाठी आता परिवहन विभाग सक्रिय झाला आहे. वेग मर्यादा ओलांडणाऱ्या वाहनचालकांचे सक्तीचे समुपदेशन केले जाणार आहे. अमरावती, नागपूर येथे समुपदेशन केंद्र सुरू झाली आहेत.. लवकरच प्रत्येक जिल्ह्याच्या हद्दीत समुपदेशन केंद्र सुरू करण्यात येत आहेत. शिवाय प्रसंगी ‘त्या’ चालकाची ‘परीक्षा’ही घेतली जाईल. वेग मर्यादा ओलांडल्याचे लक्षात येताच पुढील समुपदेशन केंद्रावर चालकाला थांबवण्यात येईल.. तिथं चालकाचे एक ते दोन तास सक्तीने समुपदेशन होईल. अपघाताच्या परिणामाच्या ध्वनिफिती दाखवल्या जातील. हे सगळं पूर्ण झाल्यावर चालकाकडून प्रश्नपत्रिका सोडवून घेतली जाईल. महत्त्वाचं म्हणजे यानंतर दंडही आकारला जाणार आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram