Sanjay Raut PC : गांधींनी मोदींना लोकसभेत घाम फोडला मला बोलू दिलं नाही, माईक बंद केला- राऊत

Continues below advertisement

Sanjay Raut PC :  गांधींनी मोदींना लोकसभेत घाम फोडला मला बोलू दिलं नाही, माईक बंद केला- राऊत महाविकास आघाडी हाच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हे शरद पवार (Sharad Pawar) यांचे वक्तव्य योग्य असल्याचे मत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)  यांनी व्यक्त केलं. राज्यात महाविकास आघाडीला पूर्ण बहुमत मिळणार आहे. आम्हाला 175-180 जागा मिळतील असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला. केंद्रात राहुल गांधी हे पंतप्रधान पदाचा चेहरा ठरवला असता तर इंडिया आघाडीच्या आणखी 25-30 जागा वाढल्या असत्या असे संजय राऊत म्हणाले. कोणतंही सरकार किंवा संस्था बिनचेहऱ्याची असू नये. आपण कोणासाठी मतदान करतो हे लोकांना कळायला हवं. लोकांनी इंदिरा गांधींना, राजीव गांधींना मतदान केलं. मोदींना मतदान केलं. त्यामुळं महाविकास आघाडीला मुख्यमंत्रीदाचा चेहरा हवा हे आमचं मत असल्याचे राऊत म्हणाले.   देवेंद्र फडणवीसांना फार गांभीर्यानं घेण्याची गरज नाही दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्यावरही राऊत यांनी टीका केली. फडणवीसांना फार गांभीर्यानं घेण्याची गरज नाही. त्यांच्या पक्षाला राज्यातील जनतेनं झिडकारुन लावलं आहे. ते स्वत:ला नाना फडणवीसांचे मोठे भाऊ समजत होते, पण तसं काही नाही. नाना फडणवीस हे साडेतीन शहाण्यांपैकी एक होते. त्या साडेतीन शहाण्यांमध्ये यांना स्थान नाही, असे म्हणत राऊतांनी फडणवीसांना टोला लागवाला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram