Sangamner तालुक्यात आगळा - वेगळा प्रजासत्ताक दिन, रांगोळीद्वारे साकारली पृथ्वीची प्रतिकृती

संगमनेर तालुक्यातील वडगावपान इथल्या डी के मोरे जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिन आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. विद्यालयातील विद्यार्थी आणि रांगोळी यांच्या सहाय्याने सोशल डिस्टन्स ठेवून पृथ्वीची प्रतिकृती काढून तिला मास्क लावलेला दाखवण्यात आलाय. मास्क मंत्र विसरू नका.. काळजी घ्या..सुरक्षित रहा.. हाच सामाजिक संदेश या माध्यमातून देण्यात आला.  विद्यालयातील कलाशिक्षक सत्यानंद कसाब आणि क्रीडाशिक्षक बाळासाहेब कांडेकर यांच्या संकल्पनेतून ही प्रतिकृती साकारण्यात आलीय.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola