Sameer Wankhede : समीर वानखेडे यांच्यावर वॉच? गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणतात... ABP Majha

Continues below advertisement

मुंबई एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडेंनी त्यांच्यावर पाळत ठेवली जात असल्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे. यासंदर्भातील एक सीसीटीव्ही फुटेजही त्यांनी  पोलीस अधिकाऱ्यांच्या सुपूर्द केलं आहे. या फुटेजमध्ये दोन जण पाठलाग करत असल्याचं दिसतंय, असा त्यांचा दावा केला. मुंबई पोलीसच वानखेडेंच्या हालचालींचा मागोवा घेत असल्याचं एनसीबीच्या सूत्रांनी सांगितलंय. वानखेडे यांच्या आईचं २०१५ साली निधन झालं.तेव्हापासून ते आपल्या आईच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी जातात. त्याच ठिकाणी वानखेडेंवर पाळत ठेवल्याचा संशय  व्यक्त करण्यात येतोय. क्रूझ पार्टी प्रकरणी शाहरुखचा मुलगा आर्यनला अटक केल्यामुळं एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे चांगलेच चर्चेत आहेत... दरम्यान नवाब मलिकांनी समीर वानखेडेंची कारवाई म्हणजे फर्जीवाडा असल्याचं म्हणत, या प्रकरणी मुंबई पोलिसांनी तपास करावा असं आवाहन केलं होतं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram