Sameer Wankhede : चार दिवसांपासून मला धमकीचे फोन येतायत, समीर वानखेडे यांची माहिती
Continues below advertisement
एनसीबीचे मुंबई विभागाचे माजी झोनल अधिकारी समीर वानखेडे यांना आज अटक होणार का, असा प्रश्न निर्माण होतोय. कारण कोर्टानं त्यांना अटकेपासून दिलेलं संरक्षण आज संपतंय. मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरू आहे.. वानखेडेंची दोन दिवस चौकशी केली आहे, त्यामुळे ते बाहेर राहिल्यास पुराव्यांशी छेडछाड करण्याची शक्यता आहे असं सीबीआयचे वकील कोर्टात म्हणाले. तर दुसरीकडे, शाहरुख खान सोबत झालेले चॅट्स बाहेर कसे आले, असा प्रश्न कोर्टानं विचारला.. हे चॅट आमच्यायाचिकेचा भाग होते, असं उत्तर वानखेडेंच्या वकिलांनी दिलं.
Continues below advertisement