Sameer Bhujbal meets Nawab Malik : समीर भुजबळ शुक्रवारी नवाब मलिकांना भेटणार
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ हे शुक्रवारी नवाब मलिक यांची भेट घेणार आहेत. मलिक यांच्या कुर्ला परिसरातील निवासस्थानी ही भेट होणार आहे. समीर भुजबळ मुंबई अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच दोघांमध्ये भेट होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे समीर भुजबळ अजित पवार गटाचे मुंबई अध्यक्ष आहेत, तर मलिक हे शरद पवार गटाचे मुंबई अध्यक्ष आहेत. त्यामुळे या पदावर देखील उद्या दोघांमध्ये चर्चा होते का ते पाहावं लागेल.