Sanjay Shirsat : पालकमंत्र्यांची असंवेदनशीलता, उपोषणकर्त्याला घरी बोलावून पाजला फळांचा रस

Continues below advertisement
संभाजीनगरचे (SambhajiNagar) पालकमंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी दाखवलेल्या असंवेदनशीलतेमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. 'शासनाने माझ्या मागण्यांचा गांभीर्याने विचार केल्याबद्दल आभार, पण उर्वरित मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात,' अशी विनंती उपोषणकर्ते संदीप सेठी (Sandeep Sethi) यांनी केली आहे. अतिवृष्टीग्रस्तांना (Heavy Rain) मदत मिळावी या मागणीसाठी कन्नडमध्ये (Kannad) संदीप सेठी हे नऊ दिवसांपासून उपोषणाला बसले होते. मात्र, पालकमंत्री संजय शिरसाट यांनी उपोषणस्थळी जाण्याऐवजी, सेठी यांना रुग्णवाहिकेतून संभाजीनगरमधील आपल्या घरी बोलावून घेतले आणि तिथे ज्यूस पाजून त्यांचे उपोषण सोडवले. पालकमंत्र्यांना कन्नडला जाण्यास वेळ नव्हता का, असा प्रश्न उपस्थित होत असून त्यांच्या या 'उपोषणकर्ता आपल्या दारी' अशा अजब पॅटर्नवर सर्वत्र टीका होत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola