Chhatrapati Sambhajinagar :संभाजीनगरचे उद्योजक खंडणीखोर नेत्यांमुळे हवालदिल,उपोषणाचे इशारे देत खंडणी

Continues below advertisement

छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक क्षेत्राची ऑटो-हब म्हणून ओळख आहे. बजाज, स्कोडा, व्हिडिओकॉन सारख्या कंपन्या या शहरात आल्या आणि शहराला नवी ओळख दिली. मात्र या शहरातील उद्योजक काही ठराविक पक्षाच्या नेत्यांमुळे हैराण झाले आहेत. काही ना काही कारण काढून, किंवा खोेटे आरोप करून खंडणी मागण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. सतत अवास्तव मागण्या करून उपोषणाचा इशारा द्यायचा, आणि कंपनीत संप नको असेल तर खंडणी द्या अशी मागणी करायची, अशी या राजकीय नेत्यांची मोडस ऑपरेंडी आहे.. या सगळ्याला कंटाळून या उद्योजकांनी आता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. एकीकडे उद्योगांना आकर्षित करण्यासाठी अनेक राज्यांमध्ये तीव्र स्पर्धा असताना, या खंडणीखोर नेत्यांमुुळे होणारं नुकसान महाराष्ट्राला परवडणारं नाही. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram