Sambhaji Raje on Sanjay Raut over MVA Morcha : संभाजीराजेंकडून संजय राऊतांची कानउघाडणी
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर मराठा क्रांती मोर्चाचा एक व्हिडीओ ट्विट केलाय. या व्हिडीओवरुन माजी खासदार संभाजीराजे यांनी संजय राऊतांवर निशाणा साधलाय. ज्या मराठा समाजाला हिणवलं, त्यांच्याच मोर्चाचा फोटो वापरताना जरा तरी तमा बाळगा अशा शब्दांत संभाजीराजे यांनी संजय राऊतांची कानउघाडणी केलीय.