Sambhaji Raje Chhatrapati : VIP लोकांसाठी शिवभक्तांना का अडवता? संभाजीराजे संतापले ABP Majha
abp majha web team
Updated at:
19 Feb 2023 11:29 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSambhajiraje Chatrapati : संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची आज जयंती राज्यामध्ये सर्वत्र उत्साहामध्ये साजरी केली जात आहे. किल्ले शिवनेरीवर (Shivneri) शिवजयंतीचा (Shivjayanti 2023) मुख्य कार्यक्रम होत आहे. या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थित आहेत. या ठिकाणी शिवभक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. मात्र, या गर्दीमध्ये सामान्य शिवभक्तांची अडवणूक झाल्याने संभाजीराजे छत्रपती चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी संतप्त भावना आपल्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांसमोर व्यक्त केल्या.