Mahapalikecha Mahasangram Sambhajinagar : 'आम्हाला नगरसेवक नकोत', संभाजीनगरकर निवडणुकीवर का भडकले?
Continues below advertisement
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या (Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation) रखडलेल्या निवडणुकांवरून नागरिक संतप्त झाले आहेत. 'नगरसेवकचीच गरज नाहीये संभाजीनगरला, प्रशासकच पाहिजे कायमस्वरुपी,' अशा थेट शब्दांत नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला आहे. गेल्या सात वर्षांपासून शहरात निवडणुका झालेल्या नाहीत आणि सध्या प्रशासक राजवट सुरु आहे. प्रशासकांच्या काळात अधिक कामे झाल्याचा दावा नागरिक करत आहेत. जायकवाडी धरण (Jaykwadi Dam) भरलेले असूनही आठ-नऊ दिवसाआड पाणीपुरवठा, रस्त्यांची दुर्दशा, निकृष्ट दर्जाचे भुयारी मार्ग, आणि टक्केवारीमुळे (Corruption) रखडलेला विकास यांसारख्या समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत. या पार्श्वभूमीवर, होणाऱ्या निवडणुकीत कोणाला कौल द्यायचा, यावर नागरिकांमध्ये संभ्रम आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement