Raj Thackeray यांना Sambhaji brigadeचं चॅलेंज, MNS कोणती भूमिका घेणार? ABP Majha
संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे यांनी मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरेंना यांना आव्हान दिलं आहे.. राज ठाकरेंनी त्यांच्याकडील इतिहास संशोधक घेऊन यावेत, आणि आमच्याकडील इतिहास संशोधकांशी खुली चर्चा करावी असं आव्हान संभाजी ब्रिगेडच्या मनोज आखरेंनी दिलं आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी चुकीचा इतिहास जगासमोर मांडला असून, राज ठाकरे त्यांना पाठिंबा का देतात असा सवाल संभाजी ब्रिगेडनं उपस्थित केला आहे.. राज ठाकरे प्रबोधनकार ठाकरेंचे रक्ताचे वारसदार आहेत, मात्र संभाजी ब्रिगेड ही वैचारिक वारसदार आहे अशा शब्दात मनोज आखरेंनी टीका केलीय. आता संभाजी ब्रिगेडच्या या टीकेनंतर मनसे काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे...