Sambhaji Bhide यांच्या शिवप्रतिष्ठानमध्ये फूट? कार्यवाहक नितीन चौगुले यांना पदावरुन हटवलं

Continues below advertisement

सांगली : संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठानमध्ये फूट पडली आहे. सांगलीत शिवप्रतिष्ठानचे कार्यवाहक नितीन चौगुले यांना पदावरुन हटवण्यात आलं आहे. शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी नितीन चौगुले यांच्यावर कारवाई केल्याची माहिती एका व्हिडीओच्या माध्यामातून दिली आहे. शिवप्रतिष्ठानच्या वतीने नितीन चौगुले यांना पदावरून हटवण्याचं नेमकं कारण अजून स्पष्ट केलेलं नाही.

शिवप्रतिष्ठानचे कार्यवाहक नितीन चौगुले यांच्यावर कारवाई केल्याची माहिती एका व्हिडीओच्या माध्यामातून संघटनेच्या वतीनं देण्यात आली. या व्हिडीओमध्ये सांगण्यात आलं आहे की, "मी शिवप्रतिष्ठानचा राष्ट्रीय अध्यक्ष प्रसारित करित आहे की, शिवप्रतिष्ठानमधून नितीन चौगुले यांना निलंबित केलं आहे, काढून टाकलं आहे. तथापि, त्यांच्याशी कोणीही संबंध ठेवू नये."

यासंदर्भात स्वतः नितीन चौगुले यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली. नितीन चौगुले म्हणाले की, "मला अद्याप कोणतंही अधिकृत कारण समजलेलं नाहीये. मी आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांची भेट घेतली. त्यांना एक निवेदन मी केलंय. जी काही कारण असतील ती मला सांगण्यात यावीत. कारण दोन दिवसांपूर्वी आम्ही एकत्र होतो. दोन दिवसांपूर्वीच शारजिल उस्मानी आणि एल्गार परिषद यांच्याविरोधात सांगलीत आंदोलन केलं होतं. त्यामुळे मी अध्यक्षांना निवेदन दिलं आहे. मला उत्तर मिळेल. अद्याप याप्रकरणी माझी गुरुजींशी काहीच बोलणं झालेलं नाही. तसेच गुरुजींचा मला कोणताही निरोप मिळालेला नाही. अध्यक्षांकडून माझ्या निलंबनाती घोषणा झाली, त्यामुळे मी त्यांनाच निवेदन दिलेलं आहे." पुढे बोलताना ते म्हणाले की, "सहकाऱ्यांकडून कारणं कळण्यापेक्षा मला अधिकाऱ्यांकडून कारणं कळतील."

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram