Chhatrapati Sambhajinagar : छ.संभाजीनगरमधील Sambhaji Bhide यांच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली
महापुरुषांवरील वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणाऱ्या संभाजी भिडेंना महाराष्ट्रातून मोठा विरोध होतोय. तर उद्याच्या छत्रपती संभाजीनगरमधील भिडेंच्या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारलीय. उद्या संध्याकाळी पाच वाजत कॅनॉट परिसरातील अग्रेसन भवन इथं भिडेंचा कार्यक्रम होता. महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आज पोलीस आयुक्तांची भेट घेत भिडेंच्या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये, जर परवानगी दिली तर कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा मविआने दिलाय. तसेच संभाजी भिडेंना अटक करण्याची मागणीही मविआने केलीय.
Tags :
Controversial Statement Protest Sambhaji Bhide Controversy Police Permit Maharashtra Mahapurush Chhatrapati Sambhajinagar Agresan Bhavan Do Not Permit