Sambhaji Bhide : महामूर्ख जमात म्हणजे हिंदू जात, गणपती उत्सव, नवरात्र उत्सव आता इव्हेंट झाले

सांगली : शिवाजी महाराजांनी हिंदू समाजाला जगाचा बाप व्हायचा मार्ग शिकवला, पण गणपती उत्सवाचा चोथा झाला आहे.  नवरात्र उत्सवात दांडिया हिंदू समाजाला XXडू बनवत चालला आहे. हे सर्व चालणार नाही, नवरात्रीचा बट्ट्याबोळ आम्ही होऊ देणार नाही. काही माता-भगिनींनी यापुढे स्वतंत्र दुर्गामाता दौड काढावी. आम्ही नवरात्रीचा बट्ट्याबोळ हाणून पाडू असे संभाजी भिडे यांनी म्हटले आहे. 

नवरात्र उत्सवानिमित्त काढण्यात येणाऱ्या सांगलीतील श्री शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौडीस आजपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. यावेळी संभाजी भिडे यांनी या दौडीत धारकऱ्यांना मार्गदर्शन करताना केलेल्या वक्तव्यांनी भूवया उंचावल्या आहेत. नवरात्र उत्सवात करमणूक सुरु असून हे सर्व नाश करत चालले आहे. हातात काठी घेऊन येणाऱ्या पोलिस गुरख्यांना सांगतो की हे सर्व तातडीने बंद करा.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola