Salman Khurshid : पुस्तकातील लेखन भोवले; काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या घरावर हल्ला, जाळपोळ

Continues below advertisement

Salman Khurshid : काँग्रेस नेता आणि माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांच्या नैनिताल येथील घरावर हल्ला करण्यात आला. खुर्शीद यांच्या घराची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. हल्ला करण्यास आलेल्या जमावाच्या हातात भाजपचा झेंडा होता. या हल्ल्यानंतर खुर्शीद यांनी आपण काही चुकीचे म्हटंल होतं का, असा सवाल केला आहे. पोलिसांनी या हल्ल्याप्रकरणी राकेश कपिलसह 20 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram