Salim Kutta : 'तो' सलीम कुत्ता नव्हे तर सलीम कुर्ला, पोलीस रेकॉर्डनुसार मारला गेलेला सलीम कुर्ला

Continues below advertisement

Salim Kutta :  पोलीस रेकॉर्डनुसार मारला गेलेल्या व्यक्तीचं नाव सलीम कुर्ला, तो सलीम कुत्ता नव्हे तर सलीम कुर्ला
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या एका हस्तकाची सध्या जोरदार चर्चा आहे. तो म्हणजे सलीम कुत्ता. याच सलीम कुत्ताच्या पार्टीत ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर सहभागी झाल्याचा आरोप झालाय.  त्यावरुन आता मोठा वाद सुरु असतानाच, आता तो जिवंत आहे की मृत याची चर्चा रंगली आहे. १९९८ मध्ये सलीम कुत्ताची रुग्णालयात हत्या झाल्याचा दावा आमदार कैलास गोरंट्याल यांनी केलाय. तर ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांनी देखील कुत्ताचा मृत्यू झाल्याचं म्हटलंय. मात्र पोलीस रेकॉर्डनुसार १९९८ मध्ये मारल्या गेलेल्या व्यक्तीचं नाव सलीम कुत्ता नव्हे तर सलीम कुर्ला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram