Salim Khan on Salman Khan Full Interview :बाबा सिद्दीकी ते लॉरेन्स बिष्णोई; सलीम खान यांची मुलाखत

Continues below advertisement

Salim Khan on Salman Khan Full Interview :बाबा सिद्दीकी ते लॉरेन्स बिष्णोई; सलीम खान यांची मुलाखत 

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान पुन्हा एकदा माध्यमांच्या केंद्रस्थानी आहे. मुंबईतील नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी (Baba siddique) यांची हत्या झाल्यानंतर बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी स्वीकारल्याने खळबळ उडाली आहे. तसेच, सलमान खान व बाबा सिद्दिकी यांचे अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध होते. सलमान खानला (Salman khan) बाबा सिद्दीकी यांची मोठी मदत झालीय. त्यामुळेच, लॉरेन्स बिश्नोई गँगने बाबा सिद्दीकींची हत्या केल्याचा आरोप होत असून बॉलिवूड (Bollywood) व गुन्हे विश्वास तशीच चर्चा आहे. पोलिसांनीही त्यादृष्टीने व इतर अँगलने या हत्याप्रकरणाचा तपास सुरू केला असून सलमान खानच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आलीय. त्यामुळे, सध्या देशभरात चर्चेत असलेल्या आणि संवेदनशील बनलेल्या सलमान खान, बाबा सिद्दीकी व लॉरेन्स बिश्नोई प्रकरणावर सलमान खानचे वडिल सलीम खान यांनी सर्वच बाबींवर बिनधास्तपणे भूमिका मांडली. तसेच, काळवीट हत्याप्रकरण, बाबा सिद्दीकी आणि सलमान खान यावर अनेक गौप्यस्फोट केले आहेत.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram