Saif Ali Khan Health Update| सैफ अली खानला आज ICU मधून खासगी वॉर्डात शिफ्ट करणार

Continues below advertisement

Saif Ali Khan Health Update| सैफ अली खानला आज ICU मधून खासगी वॉर्डात शिफ्ट करणारS

अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) याच्यावर मुंबईतील (Mumbai) राहत्या घरात चाकू हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यानंतर सैफ जखमी झाला असून त्याच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, अभिनेता सैफ याच्यावर हल्ला झाल्यानंतर विरोधी पक्षाने सरकारवर जोरदार टीका केलीये. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याची टीका विरोधी पक्षातील नेत्यांनी केली होती. आता यावर मुख्यमंत्री आणि गृहखात्याची जबाबदारी असलेल्या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  देशातील मेगा सिटींमधील सर्वात सुरक्षित शहर मुंबई आहे. हे खरं आहे की, कधी कधी घटना घडतात. त्याला गांभीर्याने घेतलं पाहिजे. मात्र,त्यामुळे मुंबई असुरक्षित आहे, असे म्हटले जाणे चुकीचे आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न असतो आणि भविष्यात अधिक कायदा सुव्यवस्था कडक व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करू, असंही फडणवीस यांनी सांगितलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram