Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या घरात शिरलेल्या चोराने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यावेळी चोर घरात शिरतानाचा नवा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. सैफ अली खान हल्ला प्रकरणाचा मुंबई पोलिस आणि क्राईम ब्राँचकडून कसून तपास सुरु असताना पोलिसांच्या हाती आता आणखी एक पुरावा लागला आहे. आरोपी इमारतीत शिरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.
आरोपीचा नवा सीसीटीव्ही समोर
अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून चोराने प्राणघातक हल्ला केला. यानंतर चोर घरात शिरला कसा असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. घटनेनंतर चोर पळ काढताना सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झाला होता. मात्र, तो आतमध्ये कसा आला याचा तपास सुरु होता. आता अखेर पोलिसांच्या प्रयत्नांना यश आलं असून तो पायऱ्या चढतानाच सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती आलं आहे.
दबक्या पावलांनी आणि तोंड बांधून आला चोर
आरोपी दबक्या पावलांनी इमारतीत शिरतानाचा सीसीटीव्ही व्हिडीओ आता पोलिसांच्या हाती लागला आहे. या सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये आरोपी तोंड बांधून दबक्या पावलांनी इमारतीच्या पायऱ्यावरून वरती येताना दिसत आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हल्लेखोर काळा रंगाचे टीशर्ट-पँट आणि बॅग घेऊन लपत-छपत पायऱ्या चढताना दिसत आहे.