Saif Ali Khan Attackerसैफवरील हल्ल्यानंतर CCTV मध्ये दिसणारा माझा मुलगा नाही,आरोपीच्या वडिलांचा दावा
Continues below advertisement
Saif Ali Khan Attackerसैफवरील हल्ल्यानंतर CCTV मध्ये दिसणारा माझा मुलगा नाही,आरोपीच्या वडिलांचा दावा
सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर आता या प्रकऱणात अटक झालेल्या शहजादबाबत मोठा दावा त्याच्या वडिलांनी केलाय. हल्ल्यानंतर सीसीटीव्हीत दिसणारा आरोपी माझा मुलगा नाही असं शहजादचे वडील रुहुल अमीन फकीर यांनी म्हटलंय. एबीपी नेटवर्कने त्यांच्याशी संवाद साधला त्यात त्यांनी हे दावे केलेत. सीसीटीव्हीत दिसणारा आणि प्रत्यक्ष पोलिसांच्या अटकेतला हे दोघे वेगळे आहेत असं त्यांनी म्हटलंय. पोलिसांच्या अटकेत असलेला माझा मुलगा आहे. मात्र सीसीटीव्हीत दिसणारा आपला मुलगा नाही असं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे आता या प्रकरणाचं गूढ वाढलंय.
Continues below advertisement