Sadhvi Pragya Claims | मालेगाव बॉम्बस्फोटातून निर्दोष सुटल्यानंतर धक्कादायक खुलासे
मालेगाव बॉम्बस्फोटातील खटल्यातून निर्दोष सुटल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंग यांनी काही दावे केले आहेत. तपास यंत्रणांनी आपल्यावर दबाव टाकल्याचे त्यांनी म्हटले आहे. "मोदींचं नाव घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला," असे वक्तव्य त्यांनी केले. तसेच, मोहन भागवत आणि आदित्य नाथांचं नाव घेण्यासाठीही दबाव टाकण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. परमवीर सिहांनी आपल्यावर आतोनात अत्याचार केल्याची गंभीर बाब देखील त्यांनी नमूद केली. या वक्तव्यांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी हे आरोप केले आहेत. या प्रकरणाच्या तपासावेळी घडलेल्या घटनांवर त्यांनी प्रकाश टाकला आहे. या दाव्यांमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.