Sadanand Kadam Arrest : चार तासांच्या चौकशीनंतर रामदास कदमांचे भाऊ सदानंद कदमांना अटक
Sadanand Kadam Arrest : चार तासांच्या चौकशीनंतर रामदास कदमांचे भाऊ सदानंद कदमांना अटक
रत्नागिरीतील खेड तालुका महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या केंद्रस्थानी आलाय. शिवसेनेतल्या बंडानंतर, धनुष्यबाण गमावल्यानंतर उदधव ठाकरेंनी जाहीर केलेल्या महाराष्ट्र दौऱ्यातील पहिल्या जाहीर सभेसाठी खेडची निवड केली. या सभेनंतर रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आणि या सगळ्या वादाची धुळ शांत व्हायच्या आतच इडीने दापोलीतल्या साई रिसॉर्टप्रकरणी अनिल परब यांचे व्यावसायिक पार्टनर आणि रामदास कदम यांचे भाऊ सदानंद कदम यांना अटक केलीये.