Sadabhau Khot Sangli : शरद पवार अलीबाबा, त्यांच्याभोवती जमलेले गडी चाळीस चोर, सदाभाऊंची खोचक टीका

Continues below advertisement

Sadabhau Khot Sangli : शरद पवार अलीबाबा, त्यांच्याभोवती जमलेले गडी चाळीस चोर, सदाभाऊंची खोचक टीका

शरद पवार हे अलीबाबा आणि  पवारांच्या भोवती जमलेले गडी हे चाळीस चोर आहेत अशी टीका आमदार सदाभाऊ खोत यांनी केलीय. जत मध्ये पोलीस पाटील यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय अधिवेशन व शासन आभार मेळाव्यात सदाभाऊ बोलत होते.. शरद पवार साहेबांनी मराठ्याला आरक्षण दिलं नाही. मात्र  मराठा आरक्षण  आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले.त्यामुळे  हे पवार साहेबांच्या लक्षात आले की देवेंद्र फडणवीस हे जालीम औषध आहे. फडणवीस एकच गोळी देतंय आणि सगळा रोग बरा करतंय हे पवारांच्या लक्षात आले.  म्हणून सकाळ संध्याकाळ उठले की सगळे देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलतात. एकप्रकारे पवारापासून संजय राऊत पर्यंत सगळ्यांना देवेंद्र फडणवीस नावाचा भस्म्या रोगच झालाय. या लोकांना देवेंद्र फडणवीस शिवाय दुसरं काही दिसत नाही।असे ही सदाभाऊ खोत म्हणालेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram