Sadabhau Khot Full PC : महाराष्ट्रातल्या कामगाराला न्याय द्या ही आमची भूमिका - सदाभाऊ खोत
Sadabhau Khot Full PC : महाराष्ट्रातल्या कामगाराला न्याय द्या ही आमची भूमिका - सदाभाऊ खोत
हेही वाचा :
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अपेक्षित मदत न केल्यामुळे भाजपला मोठा फटका बसला होता. मुंबईसह राज्यभरात याचा प्रभाव जाणवला होता. त्यामुळे भाजपच्या लोकसभेच्या जागांची (BJP Loksabha seats) संख्या 23 वरुन 9 पर्यंत खाली घसरली होती. या पार्श्वभूमीवर आता भाजपला (BJP) उपरती झाली असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांना सामील करुन घेतले जाईल.
विधानसभा निवडणुकीसाठी संघाचे कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. मुंबईतील 36 मतदारसंघांमध्ये भाजपवर संघाची करडी नजर राहणार आहे. संघाच्या हिंदुत्वाच्या अजेंड्यावरच भाजप मुंबईत लढेल, असे पक्षांतर्गत सूत्रांकडून सांगितले जात आहे. भाजपच्या विधानसभेपासून बुथनिहाय बैठकीत संघाचा प्रतिनिधी सामील होणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत प्रचाराची भाजपची रणनीती निश्चित करण्यात संघाची भूमिका महत्त्वाची असेल.
लोकसभेला संघाने पाठ फिरवल्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात भाजपची पिछेहाट झाली होती. मात्र, आता संघ विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपसोबत मैदानात उतरणार आहे.