Sadabhau khot : राजकीय घडामोडींवर सदाभाऊ खोतांची तुफान फटकेबाजी ABP Majha
Continues below advertisement
क्रांतीवीर नागनाथ अण्णा गायकवाड जन्मशताब्दी वर्षानिमित्त सांगलीच्या वाळवा इथं झालेल्या कार्यक्रमात सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील, सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर एकाच व्यासपीठावर आले. तिघांनीही मग सध्याच्या राजकीय परिस्थितीचा संदर्भ देत खुमासदार भाषण केली. सत्ता असताना आणि सत्ता गेली की कशी परिस्थिती असतेे याचा किस्सा सदाभाऊ खोत यांनी सांगितला. सध्या चर्चेत असलेल्या शहाजीबापू पाटलांवरही त्यांनी जोरदार टोलेबाजी केली.
Continues below advertisement