Sachin Tendulkar Meets Vinod Kambli : विनोद कांबळी मंचावर, राज ठाकरेंना सोडून सचिन भेटीसाठी धावला

Continues below advertisement

Sachin Tendulkar Meets Vinod Kambli : विनोद कांबळी मंचावर, राज ठाकरेंना सोडून सचिन भेटीसाठी धावला
रमाकांत आचरेकर स्मृतिस्थळाच्या लोकार्पणाप्रसंगी सचिन तेंडुलकरनं घेतली विनोद कांबळीची भेट, कांबळींच्या तब्येतीची केली चौकशी.
सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, प्रवीण अमरे यांच्यासह अनेक गुणवान खेळाडूंना घडवणारे महान प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाचं आज मुंबईतल्या शिवाजी पार्कात अनावरण करण्यात आलं. सचिन तेंडुलकरच्या हस्ते या स्मारकाचं अनावरण करण्यात आलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह आचरेकर सरांचे शिष्योत्तम विनोद कांबळी, प्रवीण अमरे, बलविंदरसिंग संधू, पारस म्हांब्रे, समीर दिघे व्यासपीठावर उपस्थित होते. आचरेकर सरांचं शिवाजी पार्कातलं स्मारक पाच क्रमांकाच्या प्रवेशद्वारासमोर उभारण्यात आलं आहे. कारण आचरेकर सरांचे शिष्य याच प्रवेशद्वारानं कामत मेमोरियल क्लबच्या खेळपट्टीवर सरावाला येत. त्यामुळं आचरेकर सरांच्या स्मारकासाठी पाच क्रमांकाच्या प्रवेशद्वाराची जागा निवडण्यात आली आहे.  


Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram