Saat Barachya Batmya : 7/12 :गुगलवर वाचलं, अकोटहून आणलं बियाणं; शेतकऱ्यानं केली काळ्या गव्हाची लागवड
Continues below advertisement
वर्ध्याच्या आर्वी तालुक्यातील जळगावच्या राजेश डफर या शेतकऱ्यांनं काळ्या गव्हाचे उत्पादन घेतलं आहे. काळा गहू शरीरासाठी चांगला असल्याचे राजेश यांनी गुगलवर वाचले होते, त्यानंतर अकोटमधून त्यांनी सुरवातीला 40 किलो बियाणे आणले. आता या एका एकरातून १८ क्विंटल उत्पादन मिळण्याची त्यांना आशा आहे. काळ्या गव्हाला बाजारात किमान 70 रुपये किलो असा दर मिळतो. या गव्हामध्ये पोषणमूल्य जास्त असल्याने याला चांगली मागणी आणि चांगला भाव मिळतो असं राजेश सांगतात.
Continues below advertisement