Saamana Editorial | 'मतचोरी'वर 'दैनिक सामना'चे सवाल, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर प्रश्नचिन्ह

दैनिक सामनाच्या अग्रलेखातून निवडणुकांवर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. मतचोरी होणार नाही याची काय खात्री, असा सवाल विचारण्यात आला आहे. तसेच, मतदार याद्यांचे घोळ होणार नाहीत याची खात्री आहे का, असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. मध्य प्रदेशातून पंचवीस हजार ईव्हीएम आणण्याचं कारस्थान आहे का, अशी शंका व्यक्त करण्यात आली आहे. व्हीव्हीपॅट न वापरण्याचा निर्णय कारस्थानाचाच भाग आहे का, यावरही सामनाने प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये खरंच लोकशाही येईल का, असाही एक महत्त्वाचा सवाल अग्रलेखातून विचारण्यात आला आहे. या अग्रलेखात म्हटले आहे की, "न्यायालयानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना पडलेल्या सरकारी बेड्या तोडल्या हे चांगलंच झालं." या मुद्द्यांवरून आगामी निवडणुकांच्या पारदर्शकतेवर आणि निष्पक्षतेवर गंभीर चर्चा सुरू झाली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola