Shakti Peeth Highway | शक्तिपीठ महामार्गामुळे राज्याचे कर्ज वाढणार - वित्त विभागाचा अभिप्राय
शक्तिपीठ महामार्गासाठी भूसंपादनाला राज्य सरकारने मान्यता दिल्यानंतर ठिकठिकाणी विरोध होत आहे. शेतकऱ्यांनी या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे. विरोधकांनी 'नवनवीन प्रकल्प आणून महाराष्ट्राची लूट सुरू आहे' असा आरोप केला. वित्त विभागाने या प्रकल्पामुळे राज्यावरील कर्ज वाढणार असल्याचा अभिप्राय दिला आहे. प्रकल्पासाठी २०,७८७ कोटींच्या आर्थिक दायित्वाचा अभिप्राय देण्यात आला. मार्च २०२६ पर्यंत राज्य सरकारवर ९.३२ लाख कोटींचे कर्ज येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.