Rupali Chakankar : 'त्या' प्रकरणात Rupali Patil यांच्यावरच कारवाई करणार, महिला आयोगाचा निर्णय
Continues below advertisement
शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे प्रकरणातील पीडितेचे फेसबुक लाईव्ह केल्याप्रकरणी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांच्यावर कारवाई केली जाईल अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी दिलीय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांच्याविरोधात काही संघटनांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रारी केल्या होत्या.. त्या तक्रारींची दखल घेऊन रुपाली पाटील यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती स्वत: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिलीय. त्यामुळे आपल्याच पक्षाच्या महिला नेत्याविरोधात कारवाई करण्याची वेळ चाकणकरांवर आलीये.
Continues below advertisement