Gulabrao Patil : माफी मागा, अन्यथा कारवाईला समोरं जा, रुपाली चाकणकर यांचा गुलाबराव पाटीलांना इशारा
आपल्या विधानांमुळे कायम चर्चेत राहणारे जळगावचे शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील आता आपल्याच विधानामुळे चांगलेच अडचणीत सापडले आहे. एक लोकप्रतिनिधी म्हणून असं विधान करणे हे निषेधार्ह आहे, त्यांनी याबद्दल जाहीर माफी मागावी अन्यथा कारवाईला सामोरं जावं, असा इशाराचा राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिलाय... गुलाबराव पाटील यांनी 'आपल्या मतदारसंघातील रस्ते हे हेमामालिनीच्या गालासारखे आहे' असं विधान करून वाद ओढावून घेतलाय.... त्यांच्या विधानाचा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेतला आहे.रुपाली चाकणकरांचा गुलाबराव पाटलांना इशारा