
RTO Office:राज्यातील आरटीओ कार्यालयांचे कामकाज दोन सत्रात होणार,कोरोनामुळे परिवहन विभागाचा निर्णय
Continues below advertisement
राज्यातील आरटीओ कार्यालयांचे कामकाज आता दोन सत्रात होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह संपूर्ण राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय. याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून परिवहन विभागाने हा निर्णय घेतलाय. वाहन परवाना, वाहन नोंदणीसह इतर कामासाठी आरटीओ कार्यालयात दररोज नागरिकांची मोठी गर्दी असते. या गर्दीला नियंत्रणात घालण्यासाठी आता आरटीओचे कामकाज दोन सत्रात घेण्यात येणार आहे. पहिल्या सत्रात सकाळी 9.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत कामकाज असणार आहे. तर दुसरं सत्र सकाळी 11 ते सायंकाळी 7 असं असेल.
Continues below advertisement