RSS Path Sanchalan | Nagpur मध्ये उद्या ऐतिहासिक Path Sanchalan, 100 वर्षांतील सर्वात मोठे!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) नागपूरमध्ये उद्या ऐतिहासिक पथसंचलन होणार आहे. हे पथसंचलन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपूरमधील आतापर्यंतचे सर्वात मोठे पथसंचलन असणार आहे. २७ सप्टेंबर १९२५ रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली होती. या स्थापनेच्या औचित्याने या पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या पथसंचलनासाठी स्वयंसेवकांचे तीन पथक वेगवेगळ्या स्थानांवरून मार्गक्रमण करतील. पहिले पथक अमरावती मार्गावरील हॉकी मैदान येथून निघेल. दुसरे पथक कस्तुरचंद पार्क येथून पथसंचलन सुरू करेल. या पथकाचे संचलन २.९ किलोमीटरचे असेल. तिसरे पथक यशवंत स्टेडियममधून पथसंचलन सुरू करेल. यामध्ये इतवारी, अजनी, अयोध्यानगर आणि नंदनवन या परिसरातील स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. हे पथसंचलन संघाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा क्षण म्हणून पाहिले जात आहे.