RSS Muslim Dialogue | मोहन भागवत-Muslim विचारवंत भेट, अनेक मुद्द्यांवर चर्चा

Continues below advertisement
दिल्लीतील हरियाणा भवन येथे सरल संघचालक मोहन भागवत आणि देशभरातील सुमारे सत्तर मुस्लिम विचारवंत व धर्मगुरू यांच्यात तीन तास महत्त्वपूर्ण चर्चा झाली. या बैठकीत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक, पहलगाम हल्ला, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांची चिथावणीखोर वक्तव्ये, तसेच बिहारमधील मतदार याद्यांचा मुद्दा, एसआयआर आणि एनआरसी यासह अनेक विषयांवर सविस्तर विचारमंथन झाले. मोहन भागवत यांनी सर्व मुद्दे शांतपणे ऐकून घेतले. मुस्लिम विचारवंतांनी अशा बैठकांचे स्वागत केले असून, यापुढेही अशा चर्चा सुरू राहतील अशी अपेक्षा व्यक्त केली. एका मुस्लिम विचारवंताने सांगितले की, "एक मीटिंग से या एक बैठक से कुछ नहीं होता। सिलसिला चलेगा, धीरे-धीरे चलेगा। प्यार बढ़ेगा, आपस की गलतफहमियां दूर होंगी, देश बढ़ेगा।" (एका बैठकीने काही होत नाही. हा सिलसिला हळूहळू सुरू राहील. प्रेम वाढेल, गैरसमज दूर होतील आणि देश प्रगती करेल.) बैठकीतील तपशील बाहेर न सांगण्याचा निर्णय घेण्यात आला. या चर्चेमुळे दोन्ही बाजूंमधील गैरसमज दूर होऊन देशाच्या प्रगतीसाठी सकारात्मक वातावरण निर्माण होईल, अशी आशा व्यक्त करण्यात आली. भविष्यातही अशा बैठका सुरू ठेवण्यावर सहमती झाली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola